WHAT IS MEAN BY DEMAT ACCOUNT
शेअर मार्केट शिकायचे,शेअर खरेदी विक्री करायचे तर त्यासाठी डिमॅट अकाउंट अत्यावश्यक आहे
जेव्हापासून शेअर्स प्रमाणापत्र बंद होऊन डिजीटल पद्धतीने शेअर्स साठवले जाऊ लागले.
तेव्हापासून डिमॅट खाते DEMAT Account ची गरज भासू लागली.
शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट खाते DEMAT Account ची आवश्यकता असते.
आपण खरेदी केलेले शेअर्स हे डिमॅट खात्यामध्ये संग्रहित होतात.
त्याचबरोबर म्युचल फंड, बॉड, डिपॉजीट हे सर्व आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमॅट खात्यात साठवून ठेवू शकतो.
डिमॅट खात्यामुळे शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार हा अतिशय वेगाने व पारदर्शक पद्धतीने होतात.
डिमॅट खात्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी विक्री करणे सहज आणि सोपे देखिल झाले आहे.
आपण ऑनलाईन हे खाते सुरु करू शकतो.
बेस्ट डिमॅट खाते काढण्याआधी लागणारी कागदपत्रे
DOCUMENT REQUIRED TO OPEN ZERODHA DEMAT
- आधारकार्ड
- मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे
- किंवा बँकखात्याच्या पुस्काच्या पहील्या पानाची प्रत
- किंवा बँकच्या चेकबुकचा फोटो
- पॅनकार्ड
- पांढऱ्या कागदावर सही करून त्या सहीचा काढलेला फोटो
बेस्ट डिमॅट खाते काढण्याअगोदर ही तयारी करावी
- आपल्या बँकेच्या खात्याचे चेकबुक असणे गरजेचे आहे.
- आपला मोबाईल नंबर जो आधार कार्ड ला लिंक आहे तो असणे गरजेचे आहे.
- आपले आधारकार्ड तसचे आपला आधार नंबर माहिती असणे आवश्यक आहे.
- आपले पॅनकार्ड सोबत असणे महत्त्वाचे आहे.
- एका पांढऱ्या कागदावर सही करून त्या सहीचा काढलेला फोटो काढून ठेवावा.
- तसेच बँकेच्या बुकच्या पहिल्या पानाचा फोटो काढून ठेवावा.
- तरी वरील सर्व वस्तु व्यवस्थीतपणे आपल्याजवळ ठेवाव्यात कारण आपल्या Zeroha DEMAT Account काढण्यासाठी हया सर्व गोष्टी लागणारच आहेत.
ऑनलाईन झीरोधाचे डिमॅट खाते
जर आपल्या ऑनलाईन खाते उघडावयाचे असेल तर पुढील पद्धतीचा अवलंब करावा
- सर्वप्रथम वरती दिलेल्या zerodha लिंक वर क्लिक करा मग SignUp Now वर क्लिक (click) करा.
- जो नंबर आधारकार्डला लिंक आहे तो 10 आकडी मोबाईलनंबर तिथे टाका. मग Continune वर क्लिक करा. तुमच्या नंबर ला एक OTP येईल तो टाका आणि Next वर क्लिक करा. हे झाले (Mobile No Verification)
- पुढची वेबपेज येईल तेथे तुमचा ईमेलआयडी Email Id टाका. मग त्या दिलेल्या EmailId वर OTP पाठविण्यात येईल तो OTP टाका आणि Next वर क्लिक करा. हे झाले (email id verification)
- पुढच्या वेबपेजवर PAN Card Verification होत असते. तिथे जन्मतारिख व बाकी थोडी माहिती टाकून चेकबॉक्स (Checkbox) ला क्लिक करून continue वर क्लिक करा.
आता सुरु होत आपली payment process
- जर आपल्याला equity and currency Account हवे असेल तर त्याला क्लिक करा जर तुम्हाला equity and currency Account तसेच commodity दोन्ही खाते हवे असेल तर दोन्ही चेकबॉक्स (Checkbox) ला क्लिक करा.
- equity and currency Account – 300 रूपये
- commodity – 200 रूपये
अशाप्रकारे पैसे आपल्याला द्यावे लागणार मग नंतर pay and continue वर करा मग त्यानंतर आपण क्रेडिट कार्ड (Credit card), नेटबँकींग नी आपली payment करा आणि Next वर क्लिक करा.
- Next Page येईल् ते त्यात आपल्या बँकेच्या खात्याची माहिती भरावयाची आहे. मर्ग सर्व डिटेल्य व्यवस्थित भरा जसे की IFSC कोड वगैरे अशी सर्व माहिती भरा व continue वर क्लिक करा.
- पुढचे वेबपेज हे Aadhar verification साठी असते. digiLocker Account असणे गरजेचे आहे नसल्यास तेथे एक लिंक दिलेली असते त्यावर क्लिक करू तुमचे digiLocker Account Open करून घ्या. नंतर दोन्ही चेकबॉक्सला (Checkbox) ओके करायचे आहे आणि त्यानंतर Click on continue वर क्लिक करा.
त्यानंतर जे लॉगिन page येईल त्यात digiLocker Account चा Username आणि Password टाका.
Username आणि Password टाकल्यानंतर आपले डिजिटल आधारकार्ड ओपन होऊन मग तिथे वरती जे रेडिओ बटण असते त्यावर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला शेअस (Share) बटण वर क्लिक करावयाचे आहे मग पुर्ण Process निट करा. त्याने आपले digiLocker Account Verification होऊन जाईल.
- Next Page येईल तुम्हाला पुन्हा तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती टाकावी लागेल. सर्व खात्याची माहिती व्यवस्थित भरा दोन्ही चेकबॉक्सला (Checkbox) ला क्लिक करून Next क्लिक करा.
- यानंतर person verification.
मग start IPV वर क्लिक करा मग कॅमेरा (Camera) ऑन होईल. मोबाईल ला हातात असा धरा की त्यावरील ओटीपी तसेच त्याबाजूला तुमचा चेहरा निट दिसेल आणि तसा चेहरा कॅमेरयात व्यवस्थितपणे दाखवा मग person verification होईल मग Save IPV वर क्लिक करा.
- त्यानंतरच्या Window वर ज्याचे नंबर आधारला लिंक आहे त्यांनी continue वर क्लीक करा.
- मग यात आपण Bank Proof Upload करणार आहे. आपल्या Cancel Check चा जो फोटो काढून ठेवला होता तो तीथे अपलोड करा.
जी सही आपण पांढऱ्या कागदावर सही करून त्या सहीचा काढलेला फोटो काढून ठेवला होता तो खाली अपलोड करावयाचा आहे.
यामुळे तुमचा E-sign equity form confirm होईल.
- त्यानंतरच्या Window वर ते दोन option तुम्हाला देतील तुम्ही gmail ला सिलेक्ट करा मग ते OTP gmail Account वरती पाठवतिल आणि Agree करून Proceed to Esign ला क्लिक करा.
- त्यानंतरच्या Window मग आपण NSDL च्या पेज वर येऊ मग आपल्याला चेकबॉक्सला (Checkbox) ला क्लिक करावयाचे आहे आणि Request For OTP ला क्लिक करा. हा OTP तुमच्या मोबाईल नंबर वर येईल तो टाकून Submit वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला संपूर्ण भरलेला फॉर्म (form) दिसेल सर्वात शेवटी जो साइन इन (sign in) बटण वर क्लिक करा परत आपण NSDL च्या page वर येऊ मग पुन्हा आधार क्रमांक टाका चेकबॉक्सला (Checkbox) ला क्लिक करून request for OTP ला क्लीक करा पुन्हा नविन आलेला OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
- आता संपूर्ण फॉर्म (form) भरून झाला आहे. त्यानंतर दोन documents physically पाठविणे महत्त्वाचे आहे. मग तो फॉर्म (form) साईन करून दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवून द्या.
- sign form डाउनलोड करा.
- DEMAT POA हा आपल्याला सही करून पाठवावा लागतो.
तो पोस्टाने त्यांनी दिलेलल्या पत्त्यावर पाठवावा लागतो जर आपण असे केले नाही तर आपण शेअर्स विकू शकत नाही.
यानंतर आपल्याला एक Email आला असेल त्यात Zerodha चा मेल आला असेल त्यात account id आणि Password reset करावयाची लींक असेल त्यावर जाऊन तुमचा Password reset करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमचे account लॉगीन करू शकता.
खाते उघडल्यास 2 दिवसानंतर आपले खाते सुरु करण्यात येते. कारण आपण दिलेल्या सर्व गोष्टी पुन्हा तपासल्या जातात आणि नंतर आपण बरोबर युजर्स आहोत आणि आपण दिलेली माहिती बरोबर आहे असे ग्राहय धरले जाते.
- जर आपले आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक नसेल तर आपल्याला एक अंडरटेकिंग लिहून द्यावयाचे असते त्याचा फॉर्म (form) देखील तीथे दिलेला असतो आता तर सर्वांचे मोबाईल क्रमांक लिंक आहेत पण अशी समस्या कधी आली तर आपण ते अंडरटेकिंग भरून देऊन आपले खाते काढून घेऊ शकतो.
अशा प्रकारे प्रोसेस करत असाल तर जास्तीत जास्त २० मिनटात प्रोसेस पूर्ण होईल व प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपल्याला २४ तासांच्या आत क्लायंट आयडी व पासवर्ड मिळेल.अधिक माहितीसाठी आपले प्रश्न कंमेंट करा.