RELIANCE INDUSTRY, JIO INVESTOR , NEXT TARGET ,COMPANY RETURNS,RELIANCE JIO PARTNERSHIP
0.15 टक्के भागीदारीसाठी ही कॉरपोरेट डिल
क्वालकॉम वेचर्स यांनी मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 730 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
जिओ हा प्लॅटफॉम भारतातील सर्वात लोकप्रिय असा आहे. भारतामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या आपण रोज वापरतो त्या जिओच्या असतात.
क्वालकॉम वैंचर्स च्या 0.15 टक्के भागीदारीने रिलायन्स जिओ चे बाजारमूल्य 5.16 लाख कोटी रूपये झाले.
याप्रकारे रिलायन्स कंपनीने आपल्या जिओ प्लॅटफॉमच्या 25.24 टक्के भागिदारीचा हिस्सा विक्री केला आहे.
क्वालकॉम वैंचर्स च्या या गुंतवणूकीने रिलायन्स जिओला बाजारभावात आणखी मजबूत रीतीने उभे राहायला मदत झाली आहे.
डिजीटल प्लॅटफॉममध्ये जिओ बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. आपल्या डिजीटल कंटैक निर्मितीने जिओने बऱ्याच मोठया गुंतवणूक दारांना आकर्षित केले आहे.
एकूण 13 भागीदारांच्या साह्य्याने जिओने आता 1,18,318.45 करोड रूपये जमा केले आहेत.
यात फेसबुकचा सर्वाधिक वाटा 43,573.62 कोटी रूपये एवढा आहे जो की, एकूण समभाग विक्रीच्या 9.99 टक्के एवढा आहे.
पुढील 13 कंपन्यांनी देखील यामध्ये पैसा दिलेला आहे.
- फेसबुक – 43,574 करोड रुपये (9.99 टक्के)
- सिल्वर लेक – 10203 करोड रुपये (2.08 टक्के)
- विस्टा इक्विटी – 11367 करोड रुपये (2.32 टक्के)
- जनरल अटलांटिक – 6598 करोड रुपये (1.34 टक्के)
- केकेआर – 11367 करोड रुपये (2.32 टक्के)
- मुबादला – 9094 करोड रुपये (1.85 टक्के)
- एलायडीए – 5683 करोड रुपये (0.93 टक्के)
- टीपीजी – 4547 करोड रुपये (1.16 टक्के)
- एल केटरटन – 1894 करोड रुपये (0.39 टक्के)
- पीआईएफ – 11367 करोड रुपये (2.32 टक्के)
- इंटेल कैपिटल – 1894 करोड रुपये (0.39 टक्के)
- क्वालकॉम वेंचर्स – 730 करोड रुपये (0.15 टक्के)
क्वालकॉम वेंचर्स ही तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी आहे.
आता 730 कोटी रूपयांच्या भागीदारीनी जणु या कंपनीसाठी नवीन युगाची सुरुवातच झाली आहे आणि याचा बराचसा फायदा कंपन्यांना होईल असे त्याचे व्यक्तिक मत देखील आहे.
जिओ प्लॅटफॉर्म ही रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल सहाय्यक कंपनी आहे.
तसेच ही कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, जिओ ॲप्स आणि हॉप्टिक, रीवायर, फाईड, नौफलॉटीज, हॅथवे आणि डीएएन सारख्या इतर अनेक संस्था आरआयएल ग्रुपची डिजिटल व्यावसाय चालविते.