डिमॅट व ट्रेडिंग खाते म्हणजे काय असते

जेव्हापासून शेअर्स प्रमाणापत्र बंद होऊन डिजीटल पद्धतीने शेअर्स साठवले जाऊ लागले. तेव्हापासून डिमॅट खाते DEMAT Account ची गरज भासू लागली.

शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट खाते DEMAT Account ची आवश्यकता असते.

आपण खरेदी केलेले शेअर्स हे डिमॅट खात्यामध्ये संग्रहित होतात. त्या

चबरोबर म्युचल फंड, बॉड, डिपॉजीट हे सर्व आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमॅट खात्यात साठवून ठेवू शकतो.

डिमॅट खात्यामुळे शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार हा अतिशय वेगाने व पारदर्शक पद्धतीने होतात.

डिमॅट खात्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी विक्री करणे सहज आणि सोपे देखिल झाले आहे.

डिमॅट खाते तुम्ही ब्रोकरस, सबब्रोकर यांच्याकडे सुरु करू शकता तसेच आपण ऑनलाईन देखील हे खाते सुरु करू शकतो.

डिमॅट खाते काढल्या नंतर तुमच्या ईमेल आयडी वर account id आणि Password reset करावयाची लींक असेल त्यावर जाऊन तुमचा Password reset करून घ्या

त्यानंतर तुम्ही तुमचे account लॉगीन करू शकता.

हे खाते अर्ज केल्यानंतर दोन दिवसाच्या आत सुरु होते. त्याद्वारे तुम्ही व्यवहार करू शकता.

ज्याप्रमाणे आपण मोबाईल बँकींग आणि नेट बँकिंग चा वापर करतो तसाच आपण ऑनलाईन पद्धतीने डिमॅट खात्याचाही वापर करू शकतो.

तसे पाहता बँक खाते व डिमॅट खाते हे एकसारखेच काम करते. यात फरक एवढाच आहे की बँकेत आपण पैशाची देवाणघेवाण करतो आणि डिमॅट खात्यावर आपण शेअर्सची देवाणघेवाण करतो.

बँकेच्या खात्यात आपले कमीत कमी 500/- रूपये तरी ठेवणे बंधनकारक आहे पण डिमॅट खाते आपण 0/- रक्केवर सुद्धा चालवू शकतो.

डिमॅट खाते काढणे खुप महत्त्वाचे आहे जर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास विचार करत असेल तर

आपले पहीले काम हेच असेल की आपण आपले डीमॅट खात तसेच ट्रेडिंग खाते काढून घ्यावे कारण या दोन्हीशिवाय आपण आपले शेअर्स खरेदीही करू शकत नाही आणि त्याची विक्रीही करू शकत नाही.

 जर आपल्याला शेअर्सची देवाण घेवाण करावयाची असेल तर आपल्याला ही दोन्ही खाते उघडणे गरजेचे आहे.

पहीले शेअर्स चे प्रमाणपत्र देण्यात येत होते पण आता हे सर्व कागदपत्री व्यवहार थांबवून सर्व गोष्टी ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे सर्व माहीती ही इलेक्ट्रॉनीक स्वरूपामध्ये साठवली जाते आणि आवश्यक तिथे ती माहिती वापरली जाते.

आपण जर पहील्यांदाच गुंतवणूक करणार असेल तर आपण प्रथम चांगले ब्रोकरर्स जे डीमॅट खाते काढून देतात यांना आपल्या STOCKMARKETMARATHI.COM  वर सर्च करावे आणि ब्रोकर  योग्य  असेल त्यांच्याकडे शक्यतो आपण हे खाते काढण्याचा प्रयत्न करावा कारण

आपल्याला नंतर काही संकटांना सामोरे नको जायला म्हणून जे सर्वांत चांगले असतील त्यांचीच निवड आपण करावी आणि त्यांच्याकडे आपली दोन्हीही खाती काढावी.

खाते काढतांना आपण देखील आपली माहिती योग्य आणि अचूक भरली आहे का याची पडताळणी करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे कारण यात चुका नको व्हायला.

खाली काही चांगल्या रेटींगच्या ब्रोकरर्सची माहिती दिलेली आहेत तर आपण त्यातला जो चांगला असेल त्यांची आपण निवड करू शकता.

ट्रेडिंग खाते म्हणजे काय असते.

WHAT IS MEAN BY TRADING ACCOUNT

ट्रेडिंग खाते हे देखील डीमॅट खात्यासारखेच असते. आपल्याला जेव्हा शेअर्स विकत घ्यावयाचे असतात तेव्हा आपल्याला हे ट्रेडिंग खाते काढणे खुप महत्तवाचे आहे.

या ट्रेडिंग खात्याशिवाय आपण हे शेअर्स विकत घेऊ शकत नाही.

रोज देवाणघेवाण केलेल्या शेअर्सची माहिती ही ट्रेडिंग खात्यातच जमा केलेली असते.

ट्रेंडिग खात्यावरून खरेदी केलेले शेअर्स हे डिमॅट खात्याला येण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागतो या प्रक्रियेस टी्+2 असे म्हणतात.

जर गुंतवणुक दाराने शेअर 1 दिवसाच्या खरेदी करून विकला तर तो ट्रेडिंग खात्यातूनच विकला जातो. म्हणजेच ट्रेडिंग खाते आणि डीमॅट खाते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

तर आपण डीमॅट खाते काढून आपले शअर्सचे संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने आणि वेळेवर करू शकता.

आपण जर नवीन गुंतवणूकदार असाल तरी देखील आपणास काही जरी मदत लागली तरी आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपला प्रश्न त्यांना विचारू शकता.

आपले डिमॅट अंकाऊट अपडेट असल्यामुळे तुम्हाला तुमचे शेअर्स खरेदी विक्रीसाठी कोणतीच समस्या येणार नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही आपले सर्व व्यवहार अतिशय सहजतेने करू शकता.

  1. या व्यवहारासाठी खर्च खूप कमी प्रमाणात लागतो.
  2. यामध्ये सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्या ईमेलवर येत असल्यामुळे व्यवहारात पारदर्शकता येते.
  3. आयपीओ मधील हस्तांतरण अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू करू शकतो.
  4. डिमॅट खात्यामुळे कागदपत्री व्यवहार थांबले गेले.
  5. डिमॅट खात्यामुळे शेअर्स लवकर ट्रार्न्सफर होऊ लागले.
  6. स्टॅम्प फी व इतर खर्च कमी झाला.
  7. शेअर्स घेण्यासाठी मर्यादा राहिली नाही.
  8. काही बदल करावयाचा असन्यास तो सोप्या पद्धतीने करता येऊ लागला.
  9. शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना सुसूत्रता ठेवता येऊ लागली.
  10. गुंतवणुकीदारांना घरी बसन्या शेअर्स खरेदी विक्री करता येऊ लागले.

You cannot copy content of this page