पॅनकार्डचे फायदे व नियम

पॅनकार्डची आवश्यकता काय?

पॅनकार्डची कशासाठी काढायचे हा देखील प्रश्न खुप लोकांना पडत असेल,

तर आपण ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापर करू शकतो तसेच बॅकेत नवीन खाते काढण्यासाठी पॅनकार्डचा नंबर हवा असतो.

तसेच जर आपल्याला आपल्या खात्यावरची 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम उचलायची असेल तर पॅनकार्ड आवश्यक आहे.

जर आपण आपला आयकर (Income tax) भरत असेल तर त्यांच्या तपशिलासाठीदेखील पॅनकार्ड हे महत्त्वाचे असते.

आपण नोकरी करत असाल तर ज्या कंपनीमध्ये आपण नोकरी करतो त्या कंपनीच्या नियमानुसार आपण आपला आयकर भरत असतो.

आपल्या ठरलेला कर हा आपल्या खात्यातून वजा होत असतो त्यांची सर्व माहिती सरकारी खात्यात जमा असते की कोणता व्यक्ति किती आयकर भरतो.

पॅनकार्डवरती आपली बरीचशी माहिती दिलेली असते आपण पॅन कार्ड काढतो तेव्हा आपण आपली अचूक माहिती देणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला नंतर अडचण येणार नाही.

एखाद्या वेळेस जरी चुकी झाली तरी आपण आपले पॅनकार्डची दुरूस्ती करून घेऊ शकतो.

दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे मग आपले पॅनकार्ड दुरुस्ती होऊन पुन्हा आपल्याला भेटू शकते.

आपण पैशाचे कोणतेही व्यवहार करत असेल तर त्यासाठी आपला पॅनक्रमांक असणे गरजेचे होते.

आपण स्वतःसाठी तसेच आपल्या कंपनीसाठीदेखील पॅनकार्ड काढू शकतो.

प्रत्येकाचा पॅनक्रमांक हा वेगळा असतो पॅन हे राष्ट्रीयकृत आणि कायमस्वरूप असणारा क्रमांक आहे.

पॅनकार्डचे फायदे
  • बँकेत खाते काढण्यासाठी पॅनकार्डची आवश्यकता आहे.
  • एफडी करावयाची असल्यास पॅनकार्ड क्रमांक लागतो.
  • पासपोर्ट काढण्यासाठी पॅनक्रमांक लागतो.
  • मालमत्ता खरेदी विक्री
  • वाहन खरेदी विक्रीसाठी
  • शेअर विकत घेण्यासाठी किंवा शेअर मार्कटमध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी देखील पॅनकार्ड आवश्यक आहे.
  • सोने खरेदी विक्री
  • म्युचल फंड मध्ये पैसे इन्वेस्ट करतांनादेखील आपले पॅनकार्ड असणे महत्त्वाचे आहे.
  • क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड काढण्यासाठी पॅनक्रमांक टाकावा लागतो.
  • डीमेट अंकाऊंट काढण्यासाठी पॅनकार्ड लागते.
  • टीडीएस रिटर्न मिळवण्यासाठी पॅनकार्ड लागते.
  • इनकम टॅक्स रिटर्न भरवायचा असल्यास
  • ओळखपत्रासाठी पॅनकार्ड अनिवर्ये असते.
  • व्यपारासाठी कर्ज
पॅन कार्डचे नियम व अटी
  1. एक व्यक्ती एकच पॅनकार्ड काढू शकतो.
  2. जो व्यक्ती पॅनकार्ड काढतो तो आयकर भरत असणे महत्त्वाचे आहे.
  3. पॅनकार्ड काढतांना चुकीची माहिती दिल्यास त्यांना दंड भरावा लागू शकतो.
  4. दुरूस्ती केलेले पॅनकार्ड आपण आपल्या पुढील व्यवहारासाठी वापरू शकतो.

You cannot copy content of this page