पॅन कार्ड म्हणजे काय? WHAT IS PAN CARD

जेव्हा आपण आपल्या बँकेचे व्यवहार करतो त्यावेळी आपल्या कानावर नेहमी पॅन कार्ड हा शब्द पडला असेल.

जेव्हा आपण आपल्या बँकेचे खाते काढतो तेव्हा आपल्याला आपला पॅन कॉर्ड नंबर विचारल्या जातो.

तर हे पॅन कार्ड नेमके काय आहे? हे आपण पाहणार आहोत.

पॅन कार्ड म्हणजे काय?

पॅन म्हणजे (PAN-Permanent Account Number) प्रत्येक व्यक्ति ज्याचे राष्ट्रीयत्त्व भारतीय आहे असा व्यक्ति आपले पॅनकार्ड काढु शकतो.

हे पॅन कार्ड आपल्याला आपल्या भारतीय आयकर कायदा, 1961 या अंतर्गत दिल्या जात असते.

पॅनकार्ड हे आपले व्यक्तिक ओळखपत्र म्हणूनदेखील वापरल्या जाते. या कायद्यानुसार आपण आपले पॅनकार्ड काढु शकतो.

एक व्यक्ति एकच पॅनकार्ड काढू शकतो तसेच पॅनकार्डमध्ये काही बदल करावयाचे असेल तर तेही करणे शक्य आहे

पॅनकार्डची रचना
  • पॅनकार्डवर पहीले भारतीय आयकर विभागाचे नाव दिलेले असते त्यानंतर पॅनकार्ड धारकाचा फोटो असतो. त्याखाली ज्याचे पॅनकार्ड आहे त्याचे नाव जसे आधारकार्ड आहे तसेच नाव पॅनकार्डवर असणे महत्त्वाचे आहे. पॅनकार्ड धारकाच्या नावाखाली त्याच्या वडीलांचे संपूर्ण नाव दिलेले असते.
  • मध्यस्थानी पॅनकार्डचा 10 अंकी नंबर असतो. जो प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. या अंकाची रचना अक्षर (Alpha) तसेच नंबर (Numeric) याचा गट असतो. प्रत्येक व्यक्तीच्या पॅनकार्ड नंबरमध्ये अशी रचना असते. हे भारतीय आयकर विभागाकडून अधिककृत प्रदान केले जाते.
  • त्यानंतर बारकोड असतो ज्यांत आपली सर्व माहिती डिजिटल पद्धतीने जमा केलेली असते असा बारकोडदेखील आपल्या पॅनकार्डवर असतो तसेच आपली जन्मतारिख आणि शेवटी आली सही दिलेली असते.

अशा प्रकारची मांडणी पॅनकार्डची असते. आपली बरीचशी माहिती पॅनकर्डावर दिलेली असते म्हणून त्यांचा उपयोग भरपूर ठिकाणी केला जातो.

पॅनकार्ड कसे काढू शकतो?

आपल्या गुगलवर आपण पॅनकार्ड ऑनलाईन (PAN Card Online) असे शोधा (search) त्यानंतर जी पहीली लींक (link) येईल त्यावर क्लिक करावयाचे आहे.

वरतीच भारतीय आयकर विभाग असे लिहिलेले असेल.

मग खाली जो फॉर्म येणार आहे तो भरावयचा आहे. त्यात असे टाकायचे-

Application type-new PAN Indian citizen

Category-individual

हे दोन ऑप्शन असे सिलेक्ट करून पुढील नाव वगैरे सगळी माहीती व्यवस्थित भरावयाची आहे

आणि सबमिट बटनवर क्लिक करावयाचे आहे.

सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर भेटेल हा टोकननंबर आपण दिलेल्या ईमेल देखील येतो. त्यानंतर Countinue with PAN Application Form यावर क्लिक करा.

पुढील सर्व माहिती एक एक करून व्यवस्थित पद्धतीने व अचूक भरावयाची आहे. आपले नाव जसे आधारकार्डवर आहे तसेच टाकावयाचे आहे

आणि Physical PAN Card वरती Yes करावयाचे जेणे करून आपले पॅनकार्ड आपल्या घरी पोस्टाने येईल.

आपल्या सर्व कागदपत्राची पडताळणी केली जाते त्यासाठी आपल्याल आपले कागदपत्रदेखील जमा करणे आवश्यक आहे आणि शेवटी सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.

अशा पद्धतीने आपण आपले पॅन कार्ड काढू शकतो. ऑनलाईन पॅनकार्ड काढणे ही पद्धत जास्त सोपी आहे. व्यवस्थित आणि अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे. 

पॅनकार्ड कोणाला मिळू शकते

व्यक्ति

कंपनी

हिंदू अविभक्त कुटुंब

विश्वस्थ आणि इतर संस्था

या सर्वजणांना भारतीय नियमानुसार पॅनकार्ड भेटू शकते. आपण आपला अर्ज केल्याच्या काही दिवसानंतर आपल्याला आपले पॅनकार्ड भेटते. जो भारताचा नागरीक आहे त्या प्रत्येक व्यक्तिला पॅनकार्ड काढण्याचा अधिकार आहे.  

You cannot copy content of this page