आधार हरवले? चिंता नको

आधार हरवले? चिंता नको.

भारतात आज, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि विविध सेवांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आज आधार हे सर्वांत महत्त्वाचे ओळखपत्र झाले. 

आपल्याला कोणत्याही प्रकारचे काम करावयाचे असेल जसे की बँकेत खाते काढणे, मोबाईलचे सिम घेणे, मालमत्ता, शैक्षणिक खरेदीविक्री तसेच अनेक प्रकारची कामे करण्यासाठी आता आपल्याला आधारकार्ड सर्वात महत्त्वाचे आहे. 

हेच कारण आहे की 12-अंकी ओळख क्रमांक प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. कोरोना संकटाच्या या कठीण काळात आपले आधार कार्ड गमावले तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.

आजकाल आधारकार्ड हे सर्वांत महत्त्वाचे आहे त्यामुळे शक्यतो आपले आधार कार्ड सांभाळणे आपले व्यक्ति कर्तव्य आहे. 

आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाची व्यक्ति ओळख आहे. आपल्या आधारकार्डमुळे आपण सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधारकार्ड असणे गरजेचे आहे.

आपले आधार हरवले तर आपण काही चरणांचे अनुसरण करून काही मिनिटांतच आपल्या आधार कार्डची डिजिटल प्रत मिळवू शकता. जर कधी कोणाचे आधार कार्ड हरवले तर त्यांना वाटत खूप काही झाले पण आता त्यांची चिंता करावयाची गरज नाही. 

आपण आपले आधारकार्ड पुन्हा मिळवू शकतो. आधार कार्ड जारी करणारी संघटना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी थॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आधार कार्ड धारकांना आणि त्यासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यक्तिस या  डिजिटल प्रती डाउनलोड करण्यास परवानगी देते.

यूआयडीएआयच्या मते, डाऊनलोड केलेला आधार पोस्टद्वारे मिळालेला आधार जितका वैध आहे. 

याचा अर्थ असा की ज्या कार्ये किंवा सेवांसाठी आपण टपाल खात्याकडून प्राप्त केलेले आधार कार्ड वापरता, आपण डाउनलोड केलेले आधार समान कार्ये किंवा सेवांसाठी वापरू शकता. 

आपण जर पुढे सांगितलेली प्रक्रिया केली तर आपण आपले आधार कार्ड आपल्या पोस्टाने आपण दिलेल्या पत्त्यावर पाठवियात येते.

 

आधार कार्ड डाउनलोड कसे करावे

1.     यूआयडीएआयच्या आधार पोर्टलवर लॉग इन करा.

2.     आताआधार मिळवाविभागाअंतर्गतआधार डाउनलोड कराया लिंकवर क्लिक करा.

3.     आधार डाउनलोड करावर क्लिक केल्यानंतर नवीन वेबपेज उघडेल. या वेबपेजवर, आपण एकतर आधार क्रमांक (यूआयडी), नोंदणी क्रमांक (ईआयडी) किंवा आभासी क्रमांक (व्हीआयडी) टाकू शकतो. आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणिपाठवा ओटीपीकिंवा सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा.

4.     आता आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 6-अंकी ओटीपी प्राप्त होईल. नवीन पेजवर, आपण ओटीपी टाका 

आणि त्यांच्या खाली काही प्रश्न विचारलेली असतात ते आपली माहिती सुरक्षित राहावी यासाठी विचारलेले असतात. त्या काही प्रश्नांची उत्तरे देखील द्या.

5.     आधार कार्डवर असलेल्या नावाची पहीली चार अक्षरे तीदेखील कॅपीटल लेटर मध्ये आणि आपल्या जन्मतारेखेच वर्षे यापैकी कोणतीही माहिती तुम्हाला तिथे विचारण्यात येते नंतर तर तुम्ही ती व्यवस्थि‍त टाकणे महत्त्वाचे आहे.  

 

6.     व नंतर आता व्हेरिफाई अँड डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. यानंतर आपल्या आधार कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड केली जाईल.

येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी पासवर्डने सुरक्षित असते म्हणजेच आपल्याला ते इलेक्ट्रानिक आधार कार्ड उघडयाचे असल्यास काही माहिती प्रदान करावी लागते तेव्हाच ते उघडते. 

याचा अर्थ असा की आधार कार्डची डिजिटल कॉपी उघडण्यासाठी आपल्याला एक संकेतशब्द प्रविष्ट करावा लागेल.

संकेतशब्दाविषयी आपल्याला ‘सत्यापित करा आणि डाउनलोड करा’ खाली माहिती मिळेल.

 हा संकेतशब्द सामान्यत: आपल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि नंतर आपल्या जन्माचा वर्ष असतो.

आधार कार्डाची डिजिटल कॉपी डाउनलोड करताना तुम्हाला ‘मुखवटा घातलेली’ प्रत (‘Masked’ कॉपी) डाउनलोड करण्याचा पर्यायही मिळेल. 

म्हणजेच आधार कार्डचे सर्व 12 अंक डिजिटल कॉपीमध्ये दिसत नाहीत. आपण आपले आधार कार्ड सांभाळून ठेवावे आणि जर हारवले तर वरील प्रक्रिया करावे जेणे करून 

आपल्याला नंतरचे कोणतेही व्यवहार करतांना समस्या येणार नाही आणि आपले काम लवकरात लवकर होईल.

You cannot copy content of this page