google investment in jio

सुंदर पिचाई यांनी आधी केलेल्या घोषणेनुसार गुगल कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रिजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 33,737 कोटी रूपयांची भागीदारी केली आहे. या गुंतवणूकीचे रिलायन्स जिओचे संपूर्ण भाग भांडवल मूल्य 1.52 लाख कोटी रूपये झाले आहे. आतापर्यंत केले गेलेल्या गुंतवणुकीला बघता ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. याआधी फेसबुकने केलेली गुंतवणूक ही 43 हजार करोड रूपये एवढी आहे. अर्थव्यवस्थेत होत असलेलया या बदलांचा परिणाम हा होईल की आता आपल्याला नवनवीन जिओचे उत्पादन बघावयास मिळतील.

गुगलच्या या गुंतवणूकीचा उद्देश हा डिजिटल इंडियाच्या मोहीमेला पाठींबा देणे हा आहे. या गुंतवणूकीने गुगल हा जिओच्या समभागांमध्ये 7.73 टक्के भागीदार झाला आहे. याचवर्षी फेसबुकने देखील 22 एप्रिलला जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये 43 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

जिओची मोठी भांडवलदार कंपनी

भविष्यातील गुगल ही जिओची सर्वांत मोठी भांडवलदार कंपनी होण्याच्या मार्गावर आहे. अधिकृत बैठकीत रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली आहे. या घोषणेच्या साह्याने गुगल आता रिलायन्स जिओसोबत स्वस्त स्मार्टफोन बनवण्यात भागीदारी करणार आहे. आता चायनीज मोबाईल भारतीय लोक घेण्यास टाळतील मग भारतीय लोकांना सामान्यपणे 10 हजार ते 15 हजार किमती पर्यंत चांगले मोबाईल भेटावे या उद्देशाने हे सर्व करण्यात आले आहे.

गुगलची ही गुंतवणूक त्यांच्या भविष्यातील 75 हजार कोटींच्या गुंतवणूकीचा एक भाग असल्याचा बोलले जात आहे. आता जिओमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 14 झाली आहे. अशा भरपूर प्रकारच्या गुंतवणूकदारांचे लक्ष्य जिओने आता आपल्याकडे ओढले.

7.73 टक्के समभागांच्या खरेदीनंतर जिओ हा फेसबुकनंतर जिओमध्ये दुसऱ्या क्रमाकांचा समभाग भांडवलदार झाला आहे. या भागीदाराने जिओच्या डिजीटल प्लॅटफॉमला जबरदस्त मदत मिळाली आहे. गुगल एकूण 42,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा विचार करत आहे. यापैकी 33 हजार कोटी रूपये रक्कम त्यांनी मुकेश अंबानी यांच्या खात्यात जमा केलेली आहे.

Jio 5G

तंत्रज्ञानानुसार जर गुगलचा रिलायन्स सोबत झालेला हा करार जिओला ऑनलाईन रिटेल, कंटेट स्ट्रिमिंग, डिजिटल देवाण घेवाण आणि शैक्षणिक व आरोग्य सेवांमध्ये बदल होईल. भविष्यात भारतात करावयाच्या 75 हजार कोटींच्या गूंतवणूकीचा विचार करता गुगलचे हे भारतीय बाजारपेठेत जबरदस्त आगमन आहे. वैश्विक बाजारपेठेच्या तुलनेत भारतीय बाजारपेठेत व्यवसायाच्या संधी लक्षात घेता गुगलने हे पाऊल उचलले आहे.

जगातील इंटरनेटवर गुगलचा प्रभाव पाहतो 60 टक्के व त्यापेक्षा अधिक वेब व्यवहार हे गुगलच्या माध्यमातून होत असतात आणि भारतात असलेल्या भविष्यातील भव्य बाजारपेठेत गुंतवणूक दार म्हणून गुगलने मायक्रोसॉफ्ट व ॲमेझॉनला चांगलीच टक्कर दिली आहे. 

जिओच्या माध्यमातून धिम्या झालेल्या अर्थचक्राला गती मिळण्याचे संकेत आता बाजारपेठेने दिले आहेत. वैश्विक स्तराच्या अनेक मोठया बाजारपेठांच्या तुलनेत भारतीय बाजारपेठेने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात बरेच यश मिळवले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत भारतातील  डिजीटल प्लॅटफॉमला फायदेशीर वातावरण झाले तयार आहे.  

जीओ गुंतवणुक

आतापर्यंत सर्व मिळून 1.52 लाख करोड रूपये एवढी मोठी रक्कम सर्वांनी मिळून जिओ मध्ये गुंतवलेली आहेत. त्या कंपन्या खालीलप्रमाणे आहेत-

फेसबुक                    43.574 कोटी रूपये               9.99 टक्के हिस्सेदारी

स्लिबरलेक                 5.656 कोटी रूपये                 1.15 टक्के हिस्सेदारी

विस्टा                       11.367 कोटी रूपये               2.32 टक्के हिस्सेदारी

जनरल अटलांटिक       6.598 कोटी रूपये                1.34 टक्के हिस्सेदारी

केकेआर                   11.367 कोटी रूपये               2.35 टक्के हिस्सेदारी

मुबादला                    9.097 कोटी रूपये                1.85 टक्के हिस्सेदारी

स्लिबरलेक                 4.547 कोटी रूपये                0.93 टक्के हिस्सेदारी

एआईडीए                  5.683 कोटी रूपये                1.16 टक्के हिस्सेदारी

टीपीजी                     4.547 कोटी रूपये                0.93 टक्के हिस्सेदारी

एलकेटरटन               1.894 कोटी रूपये                0.39 टक्के हिस्सेदारी

पीआईएफ                 11.367 कोटी रूपये               0.39 टक्के हिस्सेदारी

इंटेल कैपिटल             1.894 कोटी रूपये                0.39 टक्के हिस्सेदारी

क्लाबकॉम बेंचर्स         730 कोटी रूपये                   0.15 टक्के हिस्सेदारी

गुगल                        33.737 कोटी रूपये               7.7 टक्के हिस्सेदारी

थोडक्यात पाहिले जर प्राथमिक तसेच उच्च बाजारपेठेत ही गुंतवणूक मोठी हालचाल आणू शकते आणि सर्व बाजारपेठ पुन्हा नव्याने कामाला लागु शकतात. जिओ ही आता सर्वांत मोठी इंटरनेट देणारी आणि तसेच सर्व वस्तुंचा पुरवठा करणारी भारतातील पहिल्या नंबरची कंपनी होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार नेहमी पहिले रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉमचा विचार करतात कारण त्यांना माहिती आहे जिओ आपल्याला नेहमीच फायदेशीर आणि आर्थिकतेने देखील बळकट राहणार आहे.

अशात झालेल्या गुंतवणूकीनुसार क्वालकॉम वेचर्स यांनी मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 730 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. जिओ हा प्लॅटफॉम भारतातील सर्वात लोकप्रिय असा आहे. भारतामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या आपण रोज वापरतो त्या जिओच्या असतात. हे होत असलेले बदल सर्वांसाठीच महत्त्वाचे असतील.

You cannot copy content of this page